🌟 *ग्रामीण भागातील सर्व कुटूंबासाठी वैयक्तिक लाभाची कामासाठी सन 2021-2022 करीता अर्ज सादर करणे* 🌟
*वैयक्तिक लाभाची कामे……..*
*1) शोषखडा -* परिमाण – १.२० मी X १.२० मी X १.०० मी
अनुदान रक्कम = 2,895/-
*2) नाडेप कंपोस्टींग -* परिमाण – ३.६० मी X १.५० मी X ०.९० मी
अनुदान रक्कम = 12,474/-
*3) गांडूळ खत -* परिमाण – ४.० मी X १.५० मी X ०.६० मी
अनुदान रक्कम = 12,474/-
*4) वैयक्तिक शौचालय -* (SBM च्या यादीनुसार लाभ न घेतलेले लाभार्थी)
अनुदान रक्कम = 12,359/-
*5) विहीर/ बोअर पुर्नभरण -*
अनुदान रक्कम – 12,198/-
*6) रेशीम उदयोग तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम किमान क्षेत्र ०.४० आर करीता*
अनुदान रक्कम = 3,32,740/-
*7) शेत बांध बंदिस्ती -* परिमाण – ०.६० मी(उंची) X १.७० (रुंदी) एकुण क्षेत्र ०.५७ चौ.मी= रुपये ८००० प्रती हेक्टर
अनुदान रक्कम = १०,०००/- ते १४,०००/- (जमिन प्रकारानुसार)
*वरील प्रमाणे सर्व कामाचा लाभ एक कुटुंब घेऊ शकतात.*
🌴 *लाभार्थीची पात्रता व कागदपत्रे🌴*
*१) लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असावा.
(ज्या प्रवर्गात निवड केली आहे त्या प्रवर्गाचे संबधित कागदपत्रे सोबत जोडावीत.)*
१) अनुसूचित जाती
२) अनुसूचित जमाती
३) भटक्य जमाती (NT)
४) भटक्या विमुक्त जमाती (DT)
५) दारिद्य्र रेषेखालील इतर कुटुंब
६) महिलाप्रधान कुटुंब
७) शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब
८) भूसुधार योजनेचे लाभार्थी
९) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
१०) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी
(वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती
११) कृषी कर्जमाफी २००८ नुसार अल्प भुधारक ( १ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर (५एकर) पर्यत जमीन असलेलाशेतकरी (जमीन मालक/कुळ) व सीमांत शेतकरी (१ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ)
2) कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. (सोबत Online जॉबकार्ड किवा जॉबकार्ड प्रत झेरोक्सप्रिंट जोडणे)
3) लाभार्थीच्या नावे जमीन /जागा असणे आवश्यक आहे. (असल्यास सोबत ७/१२, ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ चाउत्तारा (तीन महिने आतील) साक्षांकित सत्य प्रत जोडावा)
4) लाभार्थी सदर गावाचा रहिवाशी असल्याबाबत रहिवासी स्वयंघोषणापत्र
5) लाभार्थी आधार कार्ड झेरोक्स प्रत
6) लाभार्थी चे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरोक्स प्रत
7) सदरचे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा/लेबर बजेट मध्ये समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार पत्र घेणे.
*वरील कागदपत्रे नुसार परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन तात्काळ आपापल्या ग्रामपंचायत देऊन योजनेचा लाभ घ्यावा.*
🌟🌴🌟🌴🌟🌴🌟🌴🌟🌴🌟🌴