पुणे
दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, महागाई गगनाला भिडलेले असताना शेतीसाठी आवश्यक असणारी खते विक्री करणाऱ्या दुकानदाराने जर चढ्या भावाने खताची विक्री केली तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी?
पुणे जिल्ह्यातील पुरंदर व मुळशी तालुक्यातील दोन खत विक्रेत्यां विरुद्ध जादा दराने युरिया खत विक्रीच्या तक्रारी आल्या कारणाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय पुणे येथील जिल्हास्तरीय भरारी पथकाने या दोन्ही दुकानांची तपासणी केली असता आलेल्या तक्रारी मध्ये तथ्य असल्याचे आढळल्याने पुरंदर तालुक्यातील मातोश्री शेती भांडार पिसर्वे व मुळशी तालुक्यातील गोपाळ बुवा कृषी भांडार करमोळी या दुकानांचे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी परवाने निलंबित केले आहेत.
सदरची कार्यवाही मा. संचालक निविष्ठा पुरवठा व गुणवत्ता नियंत्रण दिलीप झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जर एखादा विक्रेता पॉस मशीन शिवाय किंवा जादा दराने युरिया विक्री करत असेल तर आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे