लातुर
कोरोनाच्या काळात आपले पत्रकारितेचे कर्त्यव्य करत सामाजिक भान ठेवत समाजाची सेवा करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आणि गौरव कार्यक्रम राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी
संस्था लातूर च्या अंतर्गत रक्तदान हेच जीवन दान
ग्रुपचे अध्यक्ष बालाजी जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजीवनी न्युजचे कार्यकारी संपादक मंगेश गायकवाड यांना समाजरत्न पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मंगेश गायकवाड यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. गरजू नागरिकांना प्रशासकीय कामात मदत असेल किंवा मार्गदर्शन असेल पत्रकारिता करून असे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.

हा सन्मान सोहळा जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे , जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मण देशमुख, वैद्यकिय अधिकारी संतोषकुमार डोपे, शिवशाहीर संतोष साळुंके, पत्रकार रामेश्वर धुमाळ व राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव आदीच्या उपस्थितीत पत्रकार भवन लातूर येथे संपन्न झाला. यावेळी अनेक पत्रकार बांधवांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.