पुरंदर
वृक्षारोपण हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी.यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज कायमच प्रयत्नशील असल्याचे मत जलसेवक सागर काळे यांनी व्यक्तकेले.
आंबळे(ता, पुरंदर)येथे भारत फोर्ज लि पुणे व ग्रामपंचायत आंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठीआयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर,माजी सरपंच सुभाष जगताप,सदस्य विठ्ठल जगताप,गुलाबजगताप,सुमित लवांडे,पांडुरंग काळे,विजय दरेकर,उद्योजक प्रविण जगताप,मारुत्ती जगताप,दिलीप जगताप ग्रामपंचायतकर्मचारी अशोक थोरात,बाळू चव्हाण,व ग्रामस्थ उपस्थित होते.