पुरंदर निरा
नीरा (ता. पुरंदर) येथे कोरोनाचे डेल्टा प्लस प्रक्रतील विषाणू आढळून आला आहे.दोन रुग्णांना या विषाणूची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.लोकांनी या बाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात काल कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारातील विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी दिली आहे. यामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलाला तर एका चाळीस वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे.दोन्ही रुग्णांची तब्बेत चांगली असून लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे. हा विषाणू आढळल्या नंतर या रुग्णाच्या परिसरातील लोकांचे नमूने तपासणी साठी पाठवले आहेत.त्या गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे.लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून आजारी रुग्णांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे..