नीरा
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील ओढ्यात अवैधरित्या वाळू उपसा करणऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नीरा पोलीसांना यश आलंय .पोलिसांनी आज दिनांक 31 जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई . रात्रीच्या अंधारात अवैधरित्या ओढ्यातील वाळू उत्खनन करून सार्वजनिक जागेचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांना अटक करून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. ३१ रोजी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास मौजे जेऊर गावचे हद्दीत खंडोबा जवळील जेऊर पिसुर्टीचे मध्ये असलेले ओढ्यात दिलीप निवृत्ती येळे रा.पारवडी (ता.शिरूर) व निलेश पोपटराव पवार रा.वाल्हा (ता.पुरंदर) यांनी कोणतीही शासकीय परवानगी शिवाय शासकीय जागेत विनापरवानगी वाळू उत्खनन करून सार्वजनिक जागेचे नुकसान केले आहे याबाबतची फिर्याद पोलीस हवलदार संदीप मोकाशी (वय ५० वर्ष) यांनी दाखल केली.
नीरा पोलिसांनी रात्री २.३०च्या सुमारास जेऊर पिसुर्टी मध्ये असलेल्यात ओढ्यात बाळू उपष्यावर धाड टाकून सुमारे १६ लाख रुपये किंमतचे दोन ट्रॅक्टर- दोन ट्रॉली टव , ५ लाख रुपये किमतीची लाल रंगाची कार असा सुमरे २१ लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त जप्त केलीय या प्रकरणी दिलीप येळे व निलेश पवार यांना अटक करून सासवड कोर्टात हजर केले. या दोघांवर जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये भा.द. वि.क.३७९, ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ५ नुसार गून्हे दाखल करण्यात आले आहे. जेजुरी पोलीसी स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास गोतपागर पुढील तपास करत आहेत.