पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ५४ वर्षीय ज्ञानेश्वर सर्जेराव यादव यांनी शेतात गळफास घेऊन दि. २८ रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तीन नातेवाईक व इतर दोघांनी घेतलेले पैसे परत देत नव्हते उलट सावकारकी अंतर्गत गुन्हे दाखल करु असे धमकवत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. याबाबत यादव यांचा मुलगा ओमकार ज्ञानेश्वर यादव यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिल्याने, यादव यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंगोरी गावच्या हद्दीमध्ये दोन दिवसापूर्वी ज्ञानेश्वर सर्जेराव यादव (वय ५५ वर्षे) यांनी त्यांच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्या करते वेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, की सतीश पोपट खोमणे, हनुमंत पोपट कांबळे यांना त्यांनी बारा वर्षांपूर्वी २ लाख रुपये जागा खरेदीसाठी दिले होते. ते आता पैसे परत देत नव्हते व उलट पैसे मागितले तर त्यांच्यावर सावकारी करीन असे दम देत होते. तसेच मृत यादव यांच्या मुलाचे सासरे तसेच त्यांचे मेव्हणे अशोक नारायण जगताप, सासू जयश्री अशोक जगताप व मुलाची पत्नी ऐश्वर्या ओंकार यादव यांनीसुद्धा त्यांचे घेतलेले पैसे परत दिले नव्हते.
तसेच मुला बरोबर ते वारंवार भांडण करत होते व हक्क सोड पत्र करून देण्याबाबत दबाव टाकत होते या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. यादव यांचा मुलगा ओंमकार ज्ञानेश्वर यादव (वय २६ वर्षे) राहणार पिंगोरी याने सुद्धा वरील सर्वांन विरुद्ध फिर्याद दिल्याने कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार हे करत आहेत.