पुरंदर तालुक्यातील नीरा येथे युरिया खत उपलब्ध असताना सुधा मोठ्या शेतकऱ्यांना द्यायचे आहे. म्हणून सामान्य शेतकऱ्यांना नडवणाऱ्या खत विक्रेत्याला कृषी विभागानं चांगलाच दणका दिलाय.या दुकानदाराला पुढील सात दिवस खताची विक्री करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. म्हणजेच या दुकानदाराचा परवाना सात दिवसासाठी निलंबित करण्यात आला आहे.
नीरा येथील अरवींद फर्टीलायाझर या दुंकानदाराणे 14 जुलै रोजी शेतकरी अक्षय निगडे व नितीन निगडे यांना युरिया खत देण्यास नकार दिला होता.यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली होती कृषी अधिकाऱ्यांनी या दुकानास व गोडाऊनला भेट दिली असता त्यांच्याकडे 150 पोती युरिया शिल्लक असल्याचे आढळून आले होते.
यानंतर कृषी अधिकाऱ्यांसमोरच त्या दुकानदाराने अन्य दोन शेतकऱ्यांना माघारी पाठवले होते. त्यामूळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्या संदर्भात अहवाल पाठवला होता.त्यानुसार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पुढील सात दिवस या शेतकऱ्याला दुकान बंद देणाऱ्याचे आदेश दिले आहेत.अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारीज्ञानेश्वर बोटे आज 30 जुलै रोजी दिली आहे1