पुरंदर
माळशिरस(ता.पुरंदर)
कोव्हीड-१९ संपूर्ण जगाला हादरवले आहे.आतापर्यंत दोन लाटा आल्या आणि आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यातच सातत्याने लावले जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या काळात समाजात खूप लोकांच्यानोकऱ्या गेल्या.खूप कुटुंबातील कमावते व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. शेतीमालाला ही भाव मिळत नाही.मजुरीकरणाऱ्या महिला पुरुषांना काम मिळत नाही.
त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.त्यामुळे घरांमध्ये ताण तणाव,हिंसा वाढलेली दिसत आहे आणि म्हणूनचमहिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासुम संस्थेने पुरंदर तालुक्यातील वंचित घटकांना किराणा किट वाटप केले आहे. साधारण ५०० लोकांना प्रत्येकी ११०० रुपयांचं किट वाटप केले आहे. त्यामध्ये एकल महिला,कुष्ठरोग असणाऱ्याव्यक्ती, आदिवासी,कातकरी, तृतीयपंथी व्यक्ती, देवदासी, वीटभट्टी कामगार व ज्या व्यक्तींना रेशनकार्ड नाही, भटक्याजातीजमाती, हिंसापीडित महिलांचा समावेश केला आहे.एकूणच मागील वर्षी लॉक डाऊन झाला की वेगवेगळ्या स्तरातूनमदत झाली परंतु यावर्षी तसे झाले नाही म्हणून काही लोकांना खूप चणचण भासत होती.
त्यामुळे ज्यांना किराणा मिळाला त्यांनी सांगितले की, मासुमने खूप चांगली मदत केली.किराणा भरपूर होता.खूप वेळेवरमदत झाली, घरात खायला काहीच नव्हते,मासुमचे कामखऱ्या गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. मासुमने घरोघरी जाऊनकिराणा वाटप केले हे खूप चांगले काम आहे.जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा मदत केली नाही पण संस्थेने मदत केलीकाही महिलांच्या डोळ्यात पाणी आले.अशा ज्यांना किराणा वाटप केले त्यांच्या प्रतिक्रिया होत्या.