सासवड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्यावतीने पुरंदर तालुक्यातील महिला पोलीस पाटील व महिला ग्रामसेवक तसेच आशा वर्कर यांना कोरोना योद्धासन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी निरीक्षक सौ भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हानिरीक्षक कविता आल्हाट, प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री माणिकराव झेंडे पाटील, अॅड. गौरी कुंजीर माजी सभापती अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजयरावजी कोलते मा.उपाध्यक्ष कृषीसंशोधन परिषद, विराज काकडे मा. जिल्हा परिषद सदस्य ,वंदना जगताप ,अॅड कला ताई फडतरे ,युवक अध्यक्षपुष्कराज जाधव, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचेकार्याध्यक्ष विजय कुंजीर यांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने करण्यात आले होते.
