पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मुद्धा एकीकडे गाजत असताना बुलेट ट्रेनप्रकल्पासाठी याच भागातील सहा गावातील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.याबाबत प्रशासनाकडून मात्र ठोसकाही सांगितले जात नसल्यामुळे या भागातून बुलेट ट्रेन जणार का?अशी चर्चा गावच्या चावडीवर रंगू लागली आहे. मुंबईहैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या केंद्र शासनाच्या अती महत्वकांक्षी प्रकल्पाने वेग धरला आहे.महाराष्ट्र,कर्नाटक वतेलंगणा या तीन राज्यातील ७०० किलोमीटर अंतरावरील हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहे.एकट्या पुणेजिल्ह्यातील ४५ गावातील जागेंचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे.मध्य रेल्वे प्रकल्पाच्यानियोजित मर्गाशेजारच्या दोन हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीन धारकांना बोलवून त्यांची माहिती गोळा केली जातआहे.त्यामध्ये त्यांना जामीन द्यायची आहे का? द्यायची असेल तर अपेक्षित किंमत,नोकरी हवी आहे का?जमिनीच्याबदल्यात इतर ठिकाणी जमीन अथवा दुकान असे पर्याय देण्यात आले असून कुटुंबाची तसेच प्रभावित होणाऱ्यापरिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वाघापूर,आंबळे,टेकवडी,माळशिरस,राजुरी,पिसे या सहा गावातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागेचेसर्वेक्षण करून ठीक ठिकाणी लवण्यात आलेेले आहेत. पुरंदर प्रशासनाला मात्र या प्रकल्पाबाबत फारशी माहितीनाही,तसेच त्यांचा सहभागही यामध्ये दिसून येत नाही.याच भागातील काही गावांमध्ये विमानतळ प्रकल्प राबविण्याचाप्रयत्न सुरू असल्याने विमानतळ आणि बुलेट ट्रेन या दोन प्रकल्पामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
केंद्र शासनाच्या बुलेट ट्रेन या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही माहिती आमच्या पर्यंत पोहोचलेली नाही-तहसीलदाररुपाली सरनोबत.