पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पुर्व भागात असणार्या आंबळे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या समोर तसेच रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आंबळे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुरंदर तालुका सरचीटणीस सुमित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आंबळे गावचे ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप,गौरी कुंजीर,पोलिस पाटील जयश्री बधे,मा.सरपंच शशिकांत दरेकर, मा.उपसरपंच नामदेव थोरात,मा.सदस्य गुलाब जगताप,आंबळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष वैभव दरेकर,दिलीप जगताप,यशवंत शेंडगे,तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप जगताप,प्रदिप जगताप व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्र्यंबक दरेकर तसेच तलाठी भोंगळे,ग्रामसेवक वडवले या सर्व उपस्थितांच्या हस्ते बदाम,जांभुळ,वड,पिंपळ व नारळ याप्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.