मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी.
जेजुरी
श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून कु.सुहानी संपतराव कड ९९ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, कु. दुधाडे श्रुती लक्ष्मण ९६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. गरुड सृष्टी सुनिल ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.विद्यालयातून १७८ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते.सन २०२१ माध्यमिक शालान्त ( इयत्ता –दहावी ) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल,इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले होते.पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष व विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कैलास शिर्के, सुनिता जगताप, लिना पायगुडे, महेश खाडे,छाया पोटे, पोपट राणे,बाळासाहेब जगताप, सोमनाथ उबाळे,वर्षा देसाई,पांडुरंग आटोळे,मीना भैरवकर,सोनबा दुर्गाडे,पूनम उबाळे,सागर चव्हाण, अमित सागर, योगेश घोरपडे ,कुलदीप साळवे, यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थाचे व प्राचार्य नंदकुमार सागर व सर्व शिक्षकांचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप,सचिव आमदार संजय जगताप,संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष संजय जालींद्रे,संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.एम.एस.जाधव,सहसचिव दत्तात्रय गवळी,व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे यांनी अभिनंदन केले.