पुरंदर हादरला!!!         पुरंदर तालुक्यातील “या” गावात जमीनीच्या वादातुन गोळीबार,महिनाभरात दुसरी घटना….

पुरंदर हादरला!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात जमीनीच्या वादातुन गोळीबार,महिनाभरात दुसरी घटना….

पुणे

पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत सासवड पोलीस ठाण्यात विकी मुरली राजपूत वय 30 वर्षे रा. शिक्रापूर सध्या उदाचीवाडी यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विकी रजपूत व त्यांचा मावशीचा मुलगा पृथ्वीराज उत्तर सिंग राठोड व त्याचे वडील उत्तर सिंग राठोड यांच्यामध्ये चाकण मधील एक गुंठा व वाकड मधील एक गुंठा जागेवरून वाद होता.

या वादातून या दोघांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती यासंदर्भात दि.5 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या उदाचीवाडी येथील घरी असताना पृथ्वीराज राठोड व त्याचे वडील उत्तर सिंग राठोड यांनी विकी राजपूत यांच्या घराच्या बाहेर आरडाओरडा करीत शिवीगाळ करीत फिर्यादी विकी राजपूत यांना बाहेर येण्यास सांगत होते.

ते बाहेर येत नाही असे पाहुन आरोपींनी विकी राजपूत यांच्या घराच्या खिडकीवर व भिंतीवर गोळीबार केला गोळीबाराचा आवाज झाल्याने शेजारचे जागे झाल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला सदर घटनेमुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

नुकतेच वाघापूर येथे देखील अशाच पद्धतीने गोळीबाराची घटना घडली होती सातत्याने पुरंदर तालुक्यात अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशी माहिती सासवड पोलीसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *