“मिशन ऑक्सिजन”काळाची नितांत गरज-संतोष जगताप

“मिशन ऑक्सिजन”काळाची नितांत गरज-संतोष जगताप

पुरंदर

संजय कोरडे, संतोष जगताप,लोककवीराजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून सुरू झालेले मिशन ऑक्सिजन हे वृक्षसंवर्धन अभियान ही काळाची नितांत गरज असून ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीआहे.याच्या सारखे आपले सामाजिक अपयश दुसरे नसावे!असे परखड प्रतिपादन सासवड राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोषएकनाथ जगताप यांनी केले आहे.                    

मिशन ऑक्सिजनच्या माध्यमातून साई हायटेक नर्सरी सिंगापूर व एपेक्स डायग्नॉस्टिक च्या वतीने सोनोरी मल्हार गड येथेआंबा,चिंच,व कंदब,अशी बहुवर्षीय झाडे लावण्यात आली.

येणाऱ्या काळात मल्हार गड परिसरात एक लाख झाडे नुसती लावणे नव्हे तर ती जगवण्याचे “मिशनऑक्सिजन चे उद्दिष्टआहे.

या प्रसंगी मिशन ऑक्सिजनचे संचालक श्री सतीश शिंदे, किस्मत इनामदार,संजय कुंभारकर ,संजय कोरडे,चेतन जगताप, मनिषा मंडलिक, योगेश दातार, सुनिल किरदत, संदिप जाधव, विकास काळे,व सोनोरी ग्रामस्थ यांनी झाडे लावण्या साठी सहकार्य केले

2 Comments

  1. खूप चांगला उपक्रम. संपूर्ण तालुक्यात राबविण्याची नितांत गरज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *