पुणे
सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली. फुरसुंगी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवारी (ता. २०) रात्री साडेनऊ वाजता वडकी येथील कैलासनगरमधील वलवा वस्ती येथे घडली.
याबाबत रिक्षाचालक मनोहर ताबाजी डोके (वय ३६, रा. शिवसृष्टी सोसायटी, फुरसुंगी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरा सुरेश बाबूराव जमदाडे (वय ५९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) याने दारूच्या नशेत येऊन सासू-सासऱ्यास शिवीगाळ केली. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रशांत आणि सासरा सुरेश जमदाडे यांच्यात जोरदार झटापट झाली.
त्या झटापटीत सासऱ्याने कापडी गमजाने प्रशांतचा गळा आवळून डोके फरशीवर आपटले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे प्रशांतचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.