पुणे
पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचे रहिवासी विठ्ठल रामचंद्र जगताप यांची पुरंदर तालुका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.नुकतीच त्याच्या निवडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे व तालुकाध्यक्ष संदीप कटके यांनी पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
विठ्ठल जगताप हे आंबळे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य असुन त्यांनी यापुर्वी पुरंदर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्षपद भुषविले असुन पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या चिटणीस पदावरही त्यांनी काम केले आहे.
आगामी काळात पक्ष संघटन मजबुत करणार असुन जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवुन देण्यावर भर देणार:विठ्ठल जगताप,अध्यक्ष,भाजप,किसान मोर्चा, पुरंदर