पुणे
जावयानेच मावस सासूला लिबांच्या फोकाने मारहाण करून लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर( ता. हवेली) ग्रामपंचायत येथे मंगळवारी (ता.1, एप्रिल) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर शुक्रवारी (ता.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक पारधे (रा. गंगानगर फुरसुंगी) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी एका 40 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या थेऊर परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तर आरोपी अशोक पारधे हा फिर्यादी यांच्या मोठ्या बहिणीचा जावई आहे. फिर्यादी या त्यांच्या मोबाईलचे सीम आणण्यासाठी आरोपीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी केवळ सीम कोठे आहे म्हणून फक्त विचारणा केली होती.दरम्यान, १ एप्रिलला फिर्यादी घरी जात असताना, आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पाठलाग केला.
तसेच आरोपीने फिर्यादी यांना रस्त्यावरच अडविले. आणि म्हणाला “तु माझ्या घरी का आली होतीस?” तु माझ्याबरोबर राहत जा ? असे म्हणुन त्याने फिर्यादी यांचा हात धरला व दुसऱ्या हाताने जवळील लिबांच्या फोकाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आजची रात्र माझ्यासोबत चल असे म्हणून फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला. तसेच आरोपीने जीवे मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी अशोक पारधे यांच्यावर भारतीय न्याय संहीता 74, 78,118(1),352, 351 (2), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.