पुणे
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी रोमणवाडी ग्रामस्थांनी विमानतळ विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
एकाच दिवसात तब्बल ४४१ ग्रामस्थ व युवकांनी स्वाक्षऱ्या करत विमानतळाला विरोध दर्शविला. शेतकऱ्यांना विश्वासातन घेता पुरंदर मधील पांडेश्वर,रोमन वाडी,राजुरी,रिसे,पिसे नायगाव व बारामती मधील चांदगुडे वाडी भोंडवे वाडी व आंबीखुर्द येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.विमानतळाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध अधिक तीव्र होत चाललेला आहे.
नायगाव(ता,पुरंदर)येथील वाद्यावस्त्यांवर बैठका घेऊन ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत.रात्री उशिरा बैठका घेतल्या जातात तरी देखील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ बैठकांना उपस्थित राहून विचारविनिमय करताना दिसतात.
रोमणवाडी(ता,पुरंदर) येथे दि. १३ रोजी विमानतळाला विरोध दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली.यामध्ये एकूण ४४१ ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.शेतकरी, ग्रामस्थ, युवकांन बरोबर महिलांनी देखील उत्स्फुर्त पणें सहभाग नोंदवला.