पुरंदर तालुक्यातील “या” गावात दोन मोटार सायकलींमध्ये भिषण अपघात;एक जणाचा मृत्यू

पुरंदर तालुक्यातील “या” गावात दोन मोटार सायकलींमध्ये भिषण अपघात;एक जणाचा मृत्यू

सासवड प्रतिनिधी

चांबळी( ता. पुरंदर) या ठिकाणी शेतकरी कट्टा या हॉटेल समोर एका मोटार सायकलने भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वरील एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेसात वाजता घडली .

मोहन कामठे असे मृताचे तर अनिकेत शंकर तरट व रोहित विजय भोसले राहणार विठ्ठलवाडी( ता. फलटण )जिल्हा सातारा अशी जखमींची नावे असून ,यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी कट्टा हॉटेल समोर सासवड कडून येणारी मोटार सायकल एम.एच ११ डीएफ 9645 भरधाव वेगाने जात होती .त्यावेळी चांबळी गावाकडे निघालेले मोहन तुकाराम कामठे (वय 60 )राहणार चांबळी (ता. पुरंदर) यांची मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली .यात ते गंभीरित्या जखमी झाले.

असताना त्यांना तातडीने सासवड या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु रुग्णालयात उपचारावेळी मोहन कामठे यांचा मृत्यू झाला .मोटरसायकल वरील अनिकेत व रोहित या दोघांना गंभीर रित्या जखमी असल्यामुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे  रात्री उशिरापर्यंत काम चालू होते.अशी सविस्तर माहिती सासवड पोलीस स्टेशन ने दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *