पुरंदर
सुपे खुर्द ( ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण शंकर जगताप तर उपाध्यक्षपदी नारायण तुकाराम जगताप यांची निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी केली.
श्रीकांत श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी सोसायटीचे सचिव अमोल यादव, संचालक विलास आंबुले, शोभा पवार, छबुताई मोरे, उमेश जगताप, राजेंद्र जगताप, ज्ञानदेव तानवडे, बाळासाहेब जाधव, निलेश म्हेत्रे आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी अनिल उरवणे, महेश राऊत, सुमित जगताप, योगेश जगताप, सचिन राऊत, नितीन जगताप, आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण जगताप यांनी सोसायटी ची १००% वसुली करणार असे सांगितले.