लातूर
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या लातूर जिल्ह्यातील निंलगा तालुक्यातील ग्रामपंचायत राठोडा येथील सरपंचपंकज मारुतीराव शेळके यांची लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून आज महाराष्ट्र राज्यातील प्रथम माया चालते फिरते मंगलकार्यालय लातूर येथे नियुक्ती करण्यात आली.
ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे.
आज पर्यंत सरपंच संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत राज्यभरात जिल्हास्तरावर सरपंचाचे मेळावे घेवून राज्यशासनास सरपंचांच्या प्रश्नांची जाणीव करुन दिलेली आहे.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे लोकनियुक्त सरपंच असुन राज्य कार्यकारणी ही अनुभवी आहे.
निलंगा तालुक्यातील राठोडा ग्रामपंचायत हि सर्वात मोठी समजली जाते, येथील सरपंच पंकज मारुतीराव शेळके त्यांच्याराजकीय व सामाजिक कामाचा व जनसंपर्काचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर लातूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादासघोगरे, कार्याध्यक्ष माधवदादा गंभिरे, राज्य राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके,औरंगाबाद विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. ते आपल्या नियुक्तीचे श्रेय सरपंचसेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कार्याध्यक्ष माधवदादा गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, राज्य सल्लागारहनुमंत सुर्वे, राज्य संघटीका ज्योती अवघड, राज्य कार्यकारिणी सदस्य सतिश साखरे, भाऊसाहेब गिराम,औरंगाबाद विभागीय अध्यक्ष कल्याण साबळे, कार्याध्यक्ष अयुब खान पठाण, विभागीय संघटक शिवाजी सवंडकर,सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर,सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
या शानदार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा आध्यक्ष प्रा सुनील नावाडे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणूनशिक्षक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष केशव भैय्या गंभीरे, निलंगा पंचायत समिती सदस्य महेश देशमुख
लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पुणेकर, शिवाजीराव पाटील, मोहन माळी, अपराजित मरगणे, किशोर टोंपे, अभयपौळ, संजय पौळ, कुलदीप सताळकर,शंकर इटकर, सुरेश लष्कर, सरपंच विठ्ठल पाटील, धनंजय सुरक्षा, पुरुषोत्तम वाघमारे, दिपक भास्कर चेअरमन प्रमोद मरुरे, धनराज पाटील, धनाजी चांदुरे, राहुल बिराजदार, मेघराज पाटील, विवेकपाटील,अभिजित मोरे, विष्णू मोरे, पवन माकणेकपासे, महेश पाटे, बालाजी शेळके आदी उपस्थित होते.
सुत्र संचलन अड तिरुपती शिंदे यांनी तर प्रास्ताविक उत्तमराव शेळके यांनी केले.