पुणे
नवीन ट्रान्सफॉर्मर्स व सिंगल फ़ेज़ होण्याकरीता अधिक्षक अभियंता बारामती मंडल विभाग यांना पुरंदर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य महेश राऊत यांनी नुकतेच निवेदन दिले आहे.
पुरंदर तालुक्यातील काळदरी गावठाण,कर्नलवाडी येथील भोईटेमळा,आंबळे येथील जगतापवस्ती व दरेकरमळा,पिसर्वे येथील निकम मळा,सुपे खुर्द येथील पवार वस्ती व घोरवडी धरणाखालील भाग याठिकाणी सर्वे करुन नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
तसेच सोनोरी गाव,भिंताडे वस्ती व इतर दोन वस्त्या,कर्नलवाडी येथील झिरापवस्ती,राख येथील बिरोबामळा,याठिकाणी सिंगल फेज लाईन होणे गरजेचे असल्याचेही राऊत म्हणाले.
त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या चार वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्या वायरमनच्या बदल्या त्वरीत करण्यात याव्यात अशा मागणीचे पत्र महेश राऊत यांनी अधिक्षक अभियंता यांना दिलेले आहे.