पुणे
सासवड -कोंढवा मार्गावरिल पुरंदर तालुक्यातील बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन दोन वर्षोपुर्वी मोठ्या उत्साहात पार पडले .परंतु , तेव्हा पासुन तलाठी गावात येवुन कारभार पाहत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोयहोत आहे.काही महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देवुनही प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पायाभुत सुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी शासनाकडुनदेण्यात येतो परंतु ,गावातील नागरिकांच्या मुलभुत मागण्यांकडे निवेदन देवुनही दोन वर्षोपासुन दुर्लक्ष होत असल्यानेदत्ताञय फडतरे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पञ पाठवुन लवकरात लवकर निर्णय घेण्याचीमागणी केली आहे.
विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल, विधवा महिला, जेष्ठ नागरिकांना प्रमाणपञांसाठी तलाठी सही शिक्का आवश्यक असतो. जवळपास दोन वर्षैापुर्वी ग्रामपंचायतीचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .लाखो रुपये खर्च करुन डिजिटल कनेक्शन , वीज व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुसज्य तलाठी कार्यालय ,उपलब्ध असुन देखील तलाठी गावातचयेत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपुर्वी बोपगाव ग्रामपंचायतीच्यानवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देवुनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतअसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शेतकर्यांसाठी सोसायटी कर्जासाठी, सातबारा कागदपञ व शेती प्रकरणासबंधी फेरफार , शेती -पीक नुकसान भरपाईइतर कामे असल्यास तीन किलोमीटर अंतरावरिल शेजारच्या गावात हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय नियमानुसार तलाठ्यांचा सजा बोपगाव आहे, तरीसुदधा गावात तलाठी येत नाही, आठवड्यातुन किमान तीन दिवस तरी गावात येण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुरंदर तहसिल प्रशासनाच्या अंतर्गत येणार्या ग्रामपंचायतींवर कोणते तलाठी कामकाज पाहतात. ते त्या ठिकाणीच काम करतात का करत नाहीत यावर लक्ष ठेवणे, त्याचा आढावा घेणे हे तहसिल प्रशासनाचे कर्तव्य आहे, त्याकडे दोनवर्षोपासुन तहसिल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे, गावातील ग्रामस्थांची गावातच सोय व्हावी यासाठी दत्ताञयफडतरे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.