अहमदनगर
अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार बिरादार यांच्या फिर्यादीवरून आता संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत