पुणे
जुन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गाने रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे जाणाऱ्या दुचाकीला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागेवर मृत्यू झाला असून दुसरा यात गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात एवढा जोरात होता की, दुचाकीवरून माणूस उडून खाली पडला. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आले आहे.सुरेश भाऊ जेडगुले (वय-५८) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव असून मृत्यू झाला. अनिल मारुती निमसे (वय ५२,रा.निमसेमळा, आळे,ता.जुन्नर,जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून आळेफाटा पोलिसात कार चालक डॉ. गणेश अरुण वाकचौरे यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत भाउ जेडगुले यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल निमसे आणि सुरेश जेडगुले हे रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून क्र.बी.एल.ए. ६८८८ यावरून निघाले होते.
त्याचवेळी नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारे डॉ. गणेश अरुण वाकचौरे हे त्यांच्या चारचाकी क्र.एम.एच. १४, एफ.एस. २३७७ भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असल्याने त्यांनी दुचाकीला समोरून जोरात धडक दिली.कारचा वेग एवढा होता की दुचाकीवर मागे बसलेला एकजण हवेत उडून रस्त्यावर पडला.
तर दुसऱ्याला दुचाकीसहीत काही अंतरावर कारने फरपटत नेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या अपघातात सुरेश जेडगुले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यात अनिल निमसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आळेफाटा पोलिस करत आहे.