पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !रात्रीत हाेत्याचं नव्हतं झालं,”माजी” सरपंचांसह पत्नीचा गुदमरुन मृत्यु;गावावर शाेककळा

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !रात्रीत हाेत्याचं नव्हतं झालं,”माजी” सरपंचांसह पत्नीचा गुदमरुन मृत्यु;गावावर शाेककळा

पुणे

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच पाेलिसांनी माजी सरपंच यांच्या घराकडे धाव घेतली.

या घटनेबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपी गेले.

रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली असता आग विझवण्यासाठी दोघांनी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडलाने दाेघांना श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. त्यातच दाेघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.

पाेलिसांनी ग्रामस्थांकडून घटनेची अधिक माहिती घेतली व तपास सुरु केला आहे. या घटनेत माजी सरपंच मारुती भाऊ साबळे (वय 83) व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे (वय 73) यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *