मुंबई
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस देखील राजभवानावर दाखल झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ आणि अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अजित पवार लवकर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.