पुणे
पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या महिला प्रतिनिधी पदी वीर ता. पुरंदर येथील सुजाता कुंभार यांची नुकतीच निवड करण्यात आली सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा कार्यकारणी विस्तार सभेत निवड झाली.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य नेते महादेव माळवदकर, जिल्हा अध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष सुनील कुंजीर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, शिक्षक नेते लतिफ इनामदार , शांगृधर कुंभार, प्रवक्ते कुंडलिक कुंभार शिक्षक समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा मधुमाला कोल्हे, पतसंस्थेच्या मा. सभापती संगीता हिंगणे, रूपाली घोणे, अश्विनी शिंदे, उज्वला कांबळे, निर्मला घाटे, वंदना दुधाळ यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी पुणे जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी त्यांनी काम पाहिले आहे “भविष्यात महिलांच्या प्रश्नासाठी आग्रही राहून न्याय देण्याची भूमिका बजावणार असल्याचे सुजाता कुंभार यांनी सांगितले.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी तर सूत्रसंचालन पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मा. मानद सचिव गणेश कामठे यांनी केले.