विमानतळ विरोधी समितीची राहुल कुल यांच्याकडे धाव
पुणे
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नव्याने होऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा तिव्र विरोध असुन हे विमानतळ होऊ नये म्हणुन विमानतळ विरोधी संघर्ष समितीने दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडे धाव घेऊन विमानतळ नको असल्याचे निवेदन दिले.
पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष समितीने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर विमानतळ झाल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर कुल यांना आमचा विमानतळास विरोध असल्याबाबतचे निवेदन दिले.
पुरंदरचे आमदार यांनी विमानतळ बाधीत गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर विभागीय आयुक्त,महानगर आयुक्त,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,महाराष्ट्र एअरपोर्ट डेवलपमेंट कंपनी लिमीटेड,जिल्हाधिकारी पुणे यांना पुरंदरच्या पुर्व भागातील रिसे,पिसे,नायगाव,पांडेश्वर,राजुरी,मावडी,पिंपरी व बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी,भोंडवेवाडी,आंबी या गावांचा अंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणुन सुचविलेली आहे. तशा बातम्या देखील प्रसारमाध्यमातुन प्रसिद्ध झाल्या आहेत.परंतु या भागातील रहिवाशी मुळ शेतकरी आहेत.त्याचप्रमाणे या भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने येथील भाग ८० टक्के बागायती झाला आहे. त्याचप्रमाणे याभागात डाळींब,सिताफळ,पेरि,अंजीर इत्यादि फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत येथील उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याभागाचे कांदा हे मुख्य पीक आहे.येथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळी केलेली आहेत.त्याचप्रमाणे दुगधव्यावसाय,कुक्कुटपालन,मत्स्यव्यावसाय हे जोडधंदे आहेत. या भागातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबुन आहेत. नोकरी व व्यावसाय करणारे कमी आहेत.
शासनाने ज़र बळजबरीने विमानतळ केल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील तसेच नविन सुचविलेल्या जागेपासुन काही अंतरावर मयुरेश्वर अभयारण्य आहे यामुळे विमानतळ झाल्यास प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण होऊन वन्यजीव विस्कळीत होणाची शक्यता आहे. यामुळे याभागात काहीही झाले तरी विमानतळ नको अशी येथील शेतकर्यांची भुमिका आहे.
पुरंदर विमानतळाच्या शेतकरी विरोधाची संपुर्ण माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालुन विमानतळ बाधित शेतकर्यांना मदत करु असे आमदार कुल यांनी सांगीतले.
यावेळी पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक,अंकुश भगत,शशीभाऊ गायकवाड,बाळासाहेब कड़,संतोष कोलते,चंद्रकांत चौंडकर,सदाशिव चौंडकर,आनंद चौंडकर,नारायण चौंडकर,योगेश घाटे,महेंद्र खेसे,महेश कड आदी उपस्थित होते.