मराठा लोकप्रतिनिधींना घालणार घेराव
पुरंदर
मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण तसेच २१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करण्यात याव्यात या प्रश्नांसाठी दि.०५ व ०६ जुलै २०२१ रोजी होणार्या विधिमंडळ अधिवेशनात आपली भुमिका मांडुन,मराठा ओबीसीकरणासाठी विषेश अधिवेशन भरवुन राज्यपाल याच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी अशी विनंती मा.मुख्यमंत्री यांना करु व न्याय मिळवुन देऊ अशा हमीचे पत्र पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्यकारिणीला दिले.
यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे,पुरंदर तालुकाध्यक्ष संदिप बनकर,जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय जाधव,तालुका उपाध्यक्ष मनोज खळदकर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी संजय जगताप यांना निवेदन दिले व जिजाऊंची प्रतिमा व पुस्तक देऊन सन्मान केला