पुण्यातील खळबळजनक प्रकार !!!!!                                        पैसे घेतले नाही म्हणून महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुण्यातील खळबळजनक प्रकार !!!!! पैसे घेतले नाही म्हणून महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे

पुण्यात आज कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. पहिल्या दिवसांपासूनच पुणे पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कसबा निवडणुकीत भाजपची आधीपासून पिछेहाट होत असल्याचा दावा तज्त्र आणि विरोधकांकडून केला जात होता. मात्र पैसे घेतले नाही म्हणून भाजप नगरसेवकाने नागरिकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कसब्यात घडला आहे.

भाजप नगरसेवकाने आपल्याला मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.महिलांनी केलेल्या आरोपानुसार. भाजप कार्यकर्ते त्यांच्या घरी आले आणि पैसे देऊ केलं. तसेच कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र त्याला आम्ही नकार देत आम्ही तसे लोक नाहीत असं म्हटलं. मात्र त्यानंतर संतापलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली.

महिलांना मारहाण केल्याचा उल्लेख FIRमध्ये असूनही पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विचारला आहे. महिलांना मारहाण झालेली असतांनाही अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल का नाही केला. तसा गुन्हा दाखल झाला असता तर आरोपींना तत्काळ अटक झाली असती. मात्र तशी कारवाई न झाल्याने सर्व आरोपी आज मतदाना केंद्रांवर दिसत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *