एकाच झाडाला गळफास घेत युवक- युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. उत्तर सोलापूरमधील कवठे गावात ही घटना घडली असून गळफास घेणारे प्रेमी युगूल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूरमधीलकवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला युवक युवतीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.
ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली ज्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल आहे. लक्ष्मी शिवाजी तांबे असे मृत युवतीचे नाव असून ती ११ वीला भारतीय विद्यापीठात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.तर सुरज कुंडलीक चव्हाण (रा. खुनेश्र्वर तालुका, मोहोळ जिल्हा सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.दरम्यान, घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग आणि एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे. या युवक युवतीने आत्महत्येचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या आहे की घातपात अशा अनेक प्रश्नांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.