पुरंदर
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जनतेचे, रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण केले. व त्याच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी गड-किल्ले बांधले. आज असलेली या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची गरज ओळखून शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रत्येक गड किल्ल्यावर दुर्ग पूजा आयोजित केली जाते.
मागील वर्षी भारतात १३० किल्ले व भारत बाहेर ५ किल्ल्यांवर दुर्ग पूजा झाली आहे.या वर्षीच्या किल्ले दौलतमंगळ येथे होणाऱ्या दुर्ग पूजे मध्ये किल्ले दौलतमंगळ दुर्ग संवर्धन परिवार सहभागी होणार आहे.
यावेळी दुर्ग पुजे निमित्त शिवरायांनी नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना दिलेली कवड्यांची माळ शिवभक्तांच्या दर्शनासाठी किल्ले दौलत मंगळ या ठिकाणी सकाळी १० वाजता असणार आहे व नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे वंशज सौ. शितलताई मालुसरे, श्री रामचंद्र मालुसरे, श्री ओमकार मालुसरे यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व दुर्ग प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन यावेळी किल्ले दौलत मंगळ दुर्ग संवर्धन परिवाराचे उपाध्यक्ष संजय यादव यांनी केले.