पुणे
गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहित होतं, याबाबत अजित पवार यांना विचारा असा गौप्यस्फोट केला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.
आता शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी एक मोठं विधान केलं आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?, असा अप्रत्यक्षरित्या टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.