पुणे
शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. कारण आता उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षावर कसलाही हक्क राहिला नाही.निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेतील अंतर्गत निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकरणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पक्ष प्रतोत भरत गोगावले यांनी आजच आमदारांची बैठक देखील बोलावली आहे.या बैठकित नव्या राष्ट्रीय कार्यकरणीबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखपदी कोण विराजमान होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.
एकनाथ शिंदे यांना नव्या कार्यकरणीसाठी पक्षाची निवडणुक घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत पक्ष प्रमुख पदी एकनाथ शिंदे विराजमान होतात की, पक्ष नेता या नव्या पदाची निर्मिती करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.