पुरंदर तालुक्यातील “या” तिर्थक्षेत्र मंदीर परिसरात तीन दिवसांपासुन अंधार:महावितरणचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर!!!!!

पुरंदर तालुक्यातील “या” तिर्थक्षेत्र मंदीर परिसरात तीन दिवसांपासुन अंधार:महावितरणचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर!!!!!

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथील  कानिफनाथ मंदिर तसेच कडबानवाडी परिसरात घरगुती वापरासाठी असणारी लाईट तीन दिवसांपासुन नसल्याने महावितरणचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.महावितरणने दखल न घेतल्याने  मोबाईल चार्जिंग , टी.व्ही.मनोरंजनाची साधने बंद झाली आहेत . जेष्ठ नागरिक,शालेय,विद्यार्थी तसेच आॅनलाईन काम असणार्‍या व्यक्तींना मोठ्या ञासाला तोंड द्यावे लागत आहे.पीठाची गिरणी,घरात  पाणी भरणे,मिक्सर,फ्रीज वापरता येण शक्य नसल्याने महिलावर्गाची तारांबळ उडत आहे . 

महावितरण विभागातील वरिष्ठ प्रशासनाने  दखल घेवून  कायमस्वरुपी मार्ग काढण्याची मागणी  परिसरातील नागरिकांनी केली आहे .

विनाअडथळा विजेसेवा देणे महावितरणचे कर्तव्य असताना तीन दिवसानंतरही वीजपुरवठा पुर्ववत न झाल्याने बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे . विजेअभावी  दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने महावितरण विभाग  दखल तरी केव्हा घेणार? असा संतप्त सवाल या भागातील ग्रामस्थांमधुन  विचारला जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *