पुणे
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला आहे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील बांधावर असलेले गवत निष्काळजीपणाने पेटवून तो तिथून निघून गेला मात्र या दरम्यान शेताच्या शेजारी शेडमध्ये उभी केलेली पोलीस कॉन्स्टेबल यांची कार यामध्ये जळून पूर्णपणे खाक झाली. घारगाव येथे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीला आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल असलेले प्रमोद संपत चव्हाण हे घारगाव येथील रहिवासी असून त्यांच्या घराजवळ जगदीश नानाभाऊ आहेर नावाच्या शेतकऱ्याची जमीन आहे.आहेर यांनी शेतातील बांधावर वाढलेले गवत पेटवून दिले होते . त्या आगेच्या ठिणग्या तिथे उभ्या असलेल्या प्रमोद संपत चव्हाण यांच्या घरालगतच्या प्लॅस्टिक शेडवर येऊन पडल्या आणि त्यानंतर शेडने पेट घेतला. शेडने पेट घेतल्यानंतर आत ठेवलेली कार देखील पूर्णपणे यामध्ये जळून खाक झाली.
प्रमोद चव्हाण यांना याप्रकरणी खबर मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली मात्र तोपर्यंत आगीने रौन्द्र रूप धारण केलेले होते संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला देखील याप्रकरणी बोलावण्यात आले मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झालेली होती गवत पेटवतेवेळी निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल जगदीश नानाभाऊ आहेर यांच्या विरोधात घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.