बारामती लोकसभा मतदारसंघातून १४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार: विजय शिवतारे

बारामती लोकसभा मतदारसंघातून १४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार: विजय शिवतारे

पुणे

बारामती लोकसभा मतदार संघात येणारा प्रत्येक प्रकल्प बारामतीला पळविला जात आहे. विद्यमान खासदारांच्या या कारभाराला जनता कंटाळली असून बारामती लोकसभा मतदार संघात आता जनताच बदल घडवेल,असे मत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे व्यक्त केले.

शिवतारे यांनी रविवारी खेड-शिवापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी शिवतारे म्हणाले,बारामती मतदार संघात केवळ बारामतीतील मोजक्या लोकांचा विकास झाला. इतर भाग विकासापासून कायम उपेक्षित राहिला आहे. या मतदार संघात येणारा प्रत्येक प्रकल्प बारामतीला पळविण्यात येत आहे. या कारभाराला जनता कंटाळली असून आता या मतदार संघात जनताच बदल घडवेल,असं ते यावेळी म्हणाले.तसेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदार संघात यावेळी कोण उमेदवार द्यायचा? हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील.

पण यावेळी आम्ही बारामती मतदार संघात १४ जिल्हा परिषद सदस्य आणि २८ पंचायत समिती सदस्य निवडून आणणारच,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.गुंजवणी प्रकल्पाचे काम लवकर सुरु झाले तर या प्रकल्पाची किंमत वाढणार नाही. शिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. रिंगरोडसाठी जमीनीचे मूल्यांकन किंवा इतर काही अडचणींबाबत लवकरच शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल.असे शिवतारेंनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *