नाशिक
नाशिकमधील सिन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका कारने मेंढरांच्या कळपाला धडक दिली आहे. या अपघातात १२ ते १५ मेंढरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मेंढ्या या जखमी झाल्या आहे.पंचाळे गावाजवळ हा अपघात घडला आहे. एका स्विफ्ट कारने बाळूमामाच्या मेंढरांच्या कळपाला धडक दिली आहे. या कळपातील तब्बल १५ मेंढरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मेंढ्या या जखमी सुद्धा झाल्या आहे. शनिवारी हा अपघात झाला आहे.सिन्नरच्या मिरगाव येथे बाळूमामाच्या मेंढ्या असलेल्या १३ नंबरच्या पालखीचा मुक्काम होता.
या पालखीसोबत जवळपास अडीचशे मेंढ्यांचा कळप पंचाळे शिवारातील एका शेतीच्या दिशेने जात होता. त्यावेळी भरधाव स्विफ्ट या कळपात घुसली.भरधाव स्विफ्ट थेट मेंढरांच्या अंगावर गेल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२ ते १५ मेंढ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर काही मेंढ्या या जखमी झाल्या आहे. या भयानक अपघातामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या घटनेमुळे संपातही व्यक्त केला आहे.तसेच या अपघाताचा निषेध म्हणून रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत त्या रस्त्यावर गावकऱ्यांची गर्दी कमी करण्यात आली आहे.या अपघात ज्या मेंढ्या मृत झालेल्या त्या मेंढ्यांवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. तर इतर ज्या मेंढ्या जखमी झाल्या आहेत, त्यांच्या पशुवैद्यकांच्या मदतीने उपचार करण्यात येत आहे. अपघात झाल्याचे कळताच तेथील गावकरी मदतीसाठी धावून आले होते.