पुणे
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे उघडकीला आलेले असून जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने एका विवाहित असलेल्या महिलेला रात्रीच्या सुमारास फोन करून ‘ मला तू खूप आवडतेस.. मला झोप येत नाही ‘ असा संवाद करत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील पांडुर्णी येथील रहिवासी असलेला शिक्षक मारुती पांडुरंग सूर्यवंशी( वय 35 )याने पांडुर्णी गावातील एका विवाहित महिलेला ‘ मला तू मागच्या सहा वर्षांपासून खूप आवडत आहेस. माझी पत्नी सध्या नांदेडला राहते. मला झोप येत नाही मी एकटा आहे ‘ अशा शब्दात विवाहित महिलेशी संवाद केलेला होता. पीडित महिलेचे वय 30 वर्ष असल्याचे समजते.
त्याने अचानकपणे केलेल्या या फोनमुळे पीडित महिला ही घाबरून गेली तेव्हा त्याने ही माहिती तुझ्या पतीला सांगू नकोस. तुला माझं बोलणं आवडत नसेल तर मला माफ कर, असे म्हणत बुधवारी रात्री आठ वाजता मोबाईलवर फोन करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केलेली होती. आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे महिला घाबरून गेली आणि तिने तात्काळ पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली.