माळशिरस
पुरंदर तालुक्यातील वाघापूर- सिंगापूर चौफुला येथील अक्षय मंगल कार्यालय येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदर्श खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून व एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदा महिला संघ, यशस्विनी अभियान,नरसिंग महाविद्यालय शारदानगर, आयसीयू अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वाघळवाडी,ए.के.लॅब बारामती,जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती पुरंदर आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये तब्बल 730 महिलांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरामध्ये कॅन्सर तपासणी,दातांची तपासणी, त्वचा विकार,बीपी,शुगर, इसीजी,हाड व संधिवात तपासणी,वजन,डोळे तपासणी,मासिक पाळीच्या समस्या आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.या तपासण्यांमधून आजार निष्पन्न झालेल्या महिलांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून औषधोपचार,ऑपरेशन यासारख्या सुविधा मोफत देण्यात येणार असल्याची माहिती पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी दिली.
कोणतेही छोटी लक्षणे दिसली तरी दुर्लक्ष करू नका. तसेच सर्व महिलांनी शरीर जपा दररोज सर्वांनी व्यायाम करा व चालत रहा महिलांनी संतुलित आहार घ्या फळे भाजीपाला यांचे सेवन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हान बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामाप्पा इंगळे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र शिंदे,गौरव कोलते,डॉक्टर विवेक आबनावे,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, पंचायत समितीच्या माजी सभापती गौरी कुंजीर, बाजीराव कुंजीर,सोनाली खेडेकर,रेवती कुंजीर,सीमा भुजबळ,रामदास जगताप, संभाजी जगताप तसेच परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.