पुणे
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प याचे लेखापरीक्षण प्रकरणात ऑडिटर म्हणून आलेल्या व्यक्तीला लाच देण्यासाठी चक्क कार्यालयात वर्गणी गोळा करण्यात आलेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत हा प्रकार समोर आलेला असून पर्यवेक्षक असलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या पर्यवेक्षीकेला लाच घेताना पकडून दिलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विद्या गजानन सोनवणे (वय 49) असे अटक करण्यात आलेल्या पर्यवेक्षिकेचे नाव असून भोर येथील हा प्रकार आहे. भोरमधील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे लेखापरीक्षण करण्यात आलेले होते त्यासाठी ऑडिटरला लाच म्हणून पैसे देण्यासाठी चक्क वर्गणी काढण्यात आली त्यानंतर पर्यवेक्षिका सोनवणे हिने तक्रारदार यांना तुझ्या वाट्याला चार हजार रुपये आहे आले आहेत ते देऊन टाक अशी मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार महिलेने केलेल्या तक्रारीची पडताळणी 13 जानेवारी रोजी करण्यात आली त्यामध्ये विद्या सोनवणे हिने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदार महिला ही विद्या हीला 4000 रुपये देत असतानाच पथकाने कारवाई करत तिला ताब्यात घेतलेले आहे.