पुणे
विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात काल अजित पवार यांनी हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटनासाठी हजेरी लावली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावरून त्यांची लिफ्ट खाली आदळल्याची घटना घडल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या घटनेत आज श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता, असा अपघाताचा किस्सा अजित पवार यांनी सांगितला.
अजित पवार हे काल पुण्याच्या दौऱ्यावर होते. आज अजित पवार यांनी बारामतीत तालुक्यातील पवई माळ येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधताना अजित पवार म्हणाले, पुणे येथील हर्डीकर रुग्णालयामध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. त्यानंतर काही क्षणात लिफ्ट चालू होऊन पुन्हा ती खालच्या बाजूला आदळली’.
‘या भयानक घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो. नाहीतर आजचा श्रद्धांजली कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. मात्र, आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहावे ना म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगतो हा किस्सा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पवई माळ येथील जाहीर सभेत सांगितला.