पुरंदर : तालुक्यातील टेकवडी गावामध्ये ऑक्सीजन विलेज नावाची संकल्पना तेथील युवा कार्यकर्ते व टेकवडीचे उपसरपंच कु.सुरज गदादे यांनी मांडली व गावातील सहकाऱ्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ठरवले आहे या उपक्रमासाठी मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर यांच्याकडून विशेष सहकार्य लाभले यामध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडिया चे अध्यक्ष संतोषजी कोलते यांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले आणि त्यामुळे तिला प्रतिसाद देत तानाजी आप्पा चारिटेबल ट्रस्ट संचालक अरुण सर यादव यांनी पाच हजार रुपयाची झाडे तसेच संतोष कोलते मित्र परिवार यांच्यावतीने साडेतीन हजार रुपयांची झाडे मदत म्हणून देण्यात आली.
ऑक्सीजन विलेज ही एक चांगली संकल्पना असून याच्या द्वारे वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता नक्कीच भरून निघेल व त्याचा पर्जन्यमानावरही परिणाम होऊन चांगल्या स्वरूपाचा पाऊस याठिकाणी होण्यास मदत होणार आहे तरी या उपक्रमासाठी काही मदत लागल्यास संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी केले तसेच ऑक्सीजन व्हिलेज ची संकल्पना गावोगावी राबवण्याची गरज असल्याचे संतोष कोलते यांनी सांगितले तसेच अरुण सर यादव यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत युवकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.पुष्कराज दादा जाधव,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संतोषजी कोलते,माळशिरसचे माजी सरपंच अरुण सर यादव,विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष चेतन दादा जाधवराव,सासवड विद्यार्थी अध्यक्ष अतुल दादा जगताप,शरद यादव,प्रवीनजी कदम,Adv .किरण साळुंके,आदी मान्यवर उपस्थित होते.
गावच्या वतीने सुभाष महाराज इंदलकर,सरपंच सौ.रत्नाबाई इंदलकर,उपसरपंच कु.सुरज गदादे,मेजर संतोष झिंजूरके,तानाजी जाधव,प्रदीपदादा जाधव,नवनाथ गोपीनाथ इंदलकर,तुषार ईटकर, विशाल वलटे,युवराज इंदलकर,संतोष गुरव,प्रतीक गुरव,बाळू इंदलकर,आजी माजी सरपंच उपसरपंच व तरुण सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष महाराज इंदलकर व आभार युवराज इंदलकर यांनी मानले