पुरंदर
26 जानेवारी रोजी होणार देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नुतन वास्तुच्या भुमिपुजन कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार बी. एम. काळे, प्रकाश फाळके, राजेंद्र शिंदे, अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर, पत्रकार महावीर भुजबळ, समीर भुजबळ, निलेश भुजबळ, हनुमंत वाबळे,अजीम आतार, चंद्रकांत चौंडकर या शिष्टमंडळाने भेट घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 26 जानेवारी 2023 रोजी भूमिपूजना साठी वेळ दिला आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार सुप्रियाताई सुळे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.