पुणे
कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने अनेकदा नव्या वादाला तोंडही फुटतं. याच कालीचरण महाराजांनी आज, रविवारी अमरावतीत मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केलं. ‘पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित भक्तांना संबोधित करताना कालीचरण यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केलं.
कालीचरण महाराज म्हणाले, ‘ हिंदूचं राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देशात १४० कोटी जनता आहे’. तर देशात ९४ कोटी हिंदू आहे, तर ४६ कोटी मुस्लिम आहे. पुढच्या दहा वर्षात देशात मुस्लीम पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल, असा दावा कालीचरण महाराज यांनी केला आहे.
‘पूर्वीच्या काळात पाकिस्तानला भारत प्रतिउत्तर देत नव्हता. भारताला लगतचे सर्व देश पहिले भारताचे होते. मात्र ते आता सर्व हातून गेले आहे. देशातील पाच लाख मंदिर नष्ट केले. याला इतिहास साक्ष आहे, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले. कालीचरण महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर भाष्य केल्याने सामजिक वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यावर समाजातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागणार आहे.