नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द !!!! आता झाला हा बदल घ्या जाणून…..

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द !!!! आता झाला हा बदल घ्या जाणून…..

पुणे

आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असल्याने यापुढे १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आले आहे तर यापुढे १२ वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची नसेल. तसेच पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग ११ वी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे.१० वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करून ११ वी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती  मात्र आता  नव्याने ती बदलून १२वी बोर्ड परीक्षा करण्यात आली आहे.२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा १ली ते ५ वीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असेल.पूर्वी तो १ली ते ४ थीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून ८ वी काढून ती प्राथमिकला १० वी ऐवजी आता १२ वी बोर्ड असणार आहे.

माध्यमिकचा टप्पा ९ वी ते ११ वी असा राहणार आहे. पूर्वी तो ८ वी ते १० वी असा होता आणि १० वीला बोर्डाची परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी ११ वी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना १२ वी स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्चशिक्षणात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिले पाऊल आहे. १९८६ ला राबविलेले शैक्षणिक धोरण ३४ वर्षे कार्यरत होते. त्यात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहेत. या धोरणामध्ये सर्वांना संधी, दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार शिक्षण असे तीन स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *