खळबळजनक घटना!!!!!          मागील तीस वर्षापासून परिवारातील सरपंच पण आता “ग्रामपंचायत” निवडणुकीतील पराभव लागला जिव्हारी;पठ्ठ्याने काढली थेट तलवार अन् मांडला उच्छाद

खळबळजनक घटना!!!!! मागील तीस वर्षापासून परिवारातील सरपंच पण आता “ग्रामपंचायत” निवडणुकीतील पराभव लागला जिव्हारी;पठ्ठ्याने काढली थेट तलवार अन् मांडला उच्छाद

अकोला

पातूर तालुक्यातील खामखेड येथे एका इसमाने हातात तलवार घेऊन दहशत माजवल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. नेमकेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याचे जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवार समर्थकाने हातात तलवार घेऊन मतदारांना मत का दिले नाही, आता सर्वांचा हिशोब होईल असे म्हणत गावात चांगलाच उच्छाद मांडला होता. पातूर तालुक्यातील ग्राम खामखेड येथील रहिवासी सुरेश धोंडूराम गुंजकर हा हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ करत एका घरासमोर आला असता कुसुम रामदास शेळके या वयोवृद्ध महिलेने तू माझे घरासमोर येऊन कोणाला व का शिवीगाळ करत आहेस अशी विचारणा केली असता सुरेश गुंजकर याने सदर महिलेवर हल्लाबोल करून तिचा हात पिरगाळून झटापट केली.या झटापटीत सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून कुठेतरी पडल्याने त्या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता कृष्णा काळे रा.खामखेड यास सुरेश गुंजकर याने धक्काबुक्की करीत असताना कृष्णा यांच्या छातीजवळ तलवार लागल्याने केवळ त्याचे दैव बलवत्तर म्हणूनच फक्त खरचटले गेले.

खामखेड ग्रामपंचायत मध्ये मागील तीस वर्षांपासून गुंजकर परिवारातीलच सरपंच निवडून येत होता,अशे असतांना यावेळेस पहिल्यांदा त्यांचा पराभव झाल्यामुळे सुरेश गुंजकर याच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने त्याने हातात तलवार घेऊन गावातील मतदारांनी आम्हाला मतदान केले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.सदर प्रकरणी कृष्णा काळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सुरेश धोंडूराम गुंजकर रा.खामखेड याच्याविरोधात पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार असून आरोपीचा शोध व अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *