आज तुला मारून टाकतो असे म्हणत एकतर्फी प्रेमातून पुणे जिल्ह्यातील “या” गावात अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

आज तुला मारून टाकतो असे म्हणत एकतर्फी प्रेमातून पुणे जिल्ह्यातील “या” गावात अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

पुणे

प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर येथील फुरसुंगी भागात घडली आहे.

याबाबत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री हरपळे वस्तीत घडली आहे. फिर्यादीनंतर या प्रकरणी आशिष मारुती दणके (वय २४, रा. हरफळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी आशिष दणके हे परस्परांना ओळखतात. आशिष हा मुलीचा पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालत असे. दणके हा विवाहित आहे. हा प्रकार पीडितेने आशिष दणके याच्या पत्नीला देखील सांगितला. यामुळे आशिष चिडला होता.
पीडित मुलगी फुरसुंगी भागातून निघाली होती. आशिषने तिला धक्का दिला. आज तुला मारुन टाकतो, अशी धमकी देऊन त्याने पीडितेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. प्रसंगावधान राखून पीडित मुलीने वार हुकवला.

पीडित मुलीसोबत बरोबर असलेल्या मैत्रिणीला मारहाण करुन आशिष पसार झाला. हत्येचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याप्रकरणी आशिषच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डमरे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *